'K for Kathak'



 .... हे आमच्या बाईंच्या नव्या पुस्तकाचं नाव आहे. या पुस्तकाचं प्रकाशन दिमाखदार सोहळ्यात २९ नोव्हेंबर २०१९ रोजी सावित्रबाई फुले इथं होणार आहे. मंजिरिअन्सच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.
आपल्या शिक्षणाचा श्रीगणेशा झाला तो अ, आ, इ, ई.... नं. आता दिवस बदलले आहेत, आता शिक्षणाचा श्रीगणेशा होतो तोच A,B,C,D... नं (याला नक्कीच अपवाद आहेत). या परिवर्तनाबरोबर आपणही आपल्यात बदल केले पाहिजेत. ABCD वाल्यांना सुद्धा आपली संस्कृती आपले विचार आणि त्यातही शास्त्रीय नृत्याबद्दलची माहिती पोहचणं खुपचं गरजेचं आहे. पाश्चात्य संस्कृतीपेक्षा आपला नृत्याभ्यास आणि नृत्याची परंपरा या पिढीला समजावी. हाच ध्यास आमच्या बाई डॉ. सौ वेशाली दुधे यांच्या कार्यातून दिसत आहे.
शास्त्रीय नृत्याला आणि खास करून कथक नृत्याला पुढं आणण्यासाठी आमच्या बाई डॉ. सौ वेशाली दुधे नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यांची ही धडपड बघायला मिळते ती त्यांच्या लेखणीतून. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या बाईंनी आतापर्यंत तीन पुस्तक विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली आहेत. यातील पहिले 'dance Trail', त्यानंतर याची मराठी आवृत्ती 'नृत्यगाथा' ही दोन्ही पुस्तकं कथक नृत्याच्या अभ्यासक्रमासाठी आहेत. पण विशेष म्हणजे ही पुस्तकं कोणालाही समजावी अशी आहेत. नृत्य आणि त्याचा इतिहास, कथकसाठी आपले जीवन वाहिलेले अनेक दिग्गज इथं सहज अनुभवायला मिळतात.
यानंतर काय? अभ्यासक्रम सोपा कसा करता येईल? आणि बाईंच्या मनात आलं प्रवेशिका परिक्षेच्या विद्यार्थीनींसाठी अभ्यासक्रमाचं आणखी एक पुस्तक लिहायचं आणि ते ही हिंदीमध्ये... आणि 'नृत्यारंभ' घडलं.
विद्यार्थीनींना आवडेल समजेल अशा भाषेत लिहीलेली ही पुस्तक सर्वांनाच आवडत आहेत. या पुस्तकांच वैशिष्ट्य म्हणजे यात माहितीबरोबर आपल्याला मार्गदर्शक फोटोही बघायला मिळतात.
याचीच इंग्रजी आवृत्ती आहे 'K for KATHAK'.... आपल्यासाठी बाईंनी घेतलेल्या मेहनतीचं आपण नेहमीचं चीज केलं आहे. 'K for KATHAK' या पुस्तकातूनही आपला प्रवेशिका पूर्णचा अभ्यास नक्कीच सुकर होणार आहे.
बाईंची लेखणी अशीच सुरू रहावी आणि आमच्या कथकच्या ज्ञानात अशीच भर पडावी.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोविड आणि Work From Home (WFH)

कोविड आणि मीडिया