पोस्ट्स

2017 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

साडीलाही लागलेत ग्लोबलायझेशनचे वेध

इमेज
   नु कताच सर्वांनी गणेशोत्सव आनंदाने साजरा केला... आणि आता वेध लागले आहेत ते नवरात्रीचे... नऊ रंगाच्या नऊ साड्या नेसण्यासाठी सर्वच महिलांनी आपल्या ठेवणीतल्या साड्या काढण्यास सुरूवात केली असेल... सण म्हटले की साड्याच... पण खरंच साड्या बनतात कशा ? त्या मागचे कलाकार नक्की काम काय करतात... असे अनेक विचार कधी तरी आपल्याला भंडावून सोडत असतीलच... त्रिवेणीने हे समजून घेण्याची आम्हाला खुप मोठी संधी दिलेली आहे... त्रिवेणीच्या मार्फत आम्हाला साड्यांची निर्मितीची कहाणी कळली... आम्ही खास त्यांच्या साडी निर्मितीचे....  काका ही साडी नको ती दाखवा... याचा रंग जरासा गडद आहे... लाइट दाखवा ना.... असे म्हणत तासनतास आपण बायका साड्यांच्या दुकानांमध्ये आपली आवडती साडी शोधत असतो... हजारो प्रकार त्यातील काहीशे रंग... त्यातील आपण निवडलेल्या १० साड्या आणि त्यातून आपण एखादी पसंद करणार.... बापरे !!!!!  किती ते श्रम... आणि हो इतकं करूनही आपल्या नवरोबांचे खडे बोल... नाही तर खवटपणे दिलेली एखादी कमेंट ऐकायची... पण खरंच एका नजरेत नाकारणा-या आपल्यासारख्या महिलांनी हे विसरता कामा नय...

'गुरूआशिष' जादुई तिहाई....

इमेज
शेवट गोड करी स्वामी , शेवट गोड करी ... ही स्वामींवर रचलेली भैरवी खुप आवडते पण त्याचा नृत्यातून प्रात्यक्षिकरित्या अर्थ समजावला तो आमच्या नृत्यगुरू नृत्यालंकार सौ. वैशाली दुधेंनी... गुरू शिष्याच्या नात जपणारी गुरूपौर्णिमा... यंदाच्या गुरूपौर्णिमेला आमच्य गुरूंनी तिहाईरुपी अमृत टाकून आमच्यातल्या कलाकाराला प्रेरीत केलं.... तिहाई म्हणजे तीन वेळा तत्कार करून समेवर समारोप करणे... अर्थात कोणत्याही नृत्याचा, गाण्याचा शेवट... पण हा शेवट खरे म्हणजे अंतिम सत्य आहे... सत्यम् शिवम् सुंदरम् किंवा ब्रम्हा विष्णु महेश... विज्ञानात म्हणावे तर प्रोटॉन न्युट्रोन इलेक्ट्रॉन.... बापरे... तिहाईबद्दल इतकी माहिती... आमच्या गुरू नृत्यालंकार सौ. वैशाली दुधे या सुंदरशा छोट्याशा पण खुप महत्वाच्या विषयावर PHD करत आहेत. त्यामुळे यंदाच्या गुरूपौर्णिमेच्या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य अर्थातच तिहाई हे होते....   बाईंचा छोट्याशा एक्सिडंटमुळे पायाला एअर फॅक्चर झाले... त्यामुळे या कार्यक्रमाला थोडा उशीर झाला खरा... पण या वैशिष्ट्यपू...