पोस्ट्स

जुलै, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कोविड आणि मीडिया

इमेज
काही दिवसापूर्वी एका महिला पत्रकाराला बातमी संदर्भात कॉल केला... बोलणं झाल्यानंतर सहज विचारलं काय गं कशी आहेस? काळजी घे समोरनं उत्तर आलं छान आणि हो थँक्स असं विचारल्याबद्दल... खरंच मनातल्या लहरींनी वेग धरला... म्हणाले असं का बोलतेस ... अगं तुला एक मुलगा आहे तो लहान आहे आणि तरी तू रिपोर्टींग करतेस... तरी जरा संभाळून... तिने हो असे उत्तर दिल...  काळजी घे.... हे शब्द सध्या खूप महत्वाचे आहेत... कोरोनामध्ये आज प्रत्येक रिपोर्टर, कॅमेरामनच नाही तर डेस्कवर असणारे, एडिटर, प्रोड्युसर, एंकरपासून सर्वजण जीव मुठीत ठेवून काम करत आहेत. बोलणारे महाभाग बोलतातही आम्ही थोडी करायला सांगितलं आहे का... पण आज ज्या बातम्या आपण बघतो किंवा एक एक issue बघतो ते फक्त आणि फक्त या मीडियामुळे साध्य होते. माझी बहिण आजही ऑफिसला जाते. त्यांच्याकडे आजही वातावरण ब-यापैकी तंग असतं. अनेकजणांना अगदी तिच्या बाजूच्याला कोरोना झाला होता. घरी लहान मुलगा आणि म्हातारे सासरे... पण ती ऑफिसला आजही जाते.  बोलणारे बोलणार तिला काय शहाणपणा करायची गरज आहे. पण हा तिचा job profile आहे. तिचे किस्से खरंच काळजाला धडकी भरणा...

अशीही गुरूपौर्णिमा....

इमेज
आज गुरूपौर्णिमा... आपल्या गुरूबद्दलची कृतज्ञता दाखवण्याचा दिवस... आपल्यातील अहम् पणा कमी करायचा असेल तर नक्कीच आपण नतमस्तक होणे गरजेचे आहे... अशा गोष्टी खरंच आपल्याला उमगतात??? आपण एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की ती गोष्ट आज ना उद्या नक्कीच मिळतेच.... नृत्य आणि माझं नात असंच आहे. मी बरेच वेळा याचा उल्लेख अनुभूती म्हणून करते. ती अनुभूती ज्याने आपल्याला आपल्या आयुष्याचा  उद्देश मिळतो. किंवा आपलं जीवन सार्थकी लागलं याची जाणीव होते. मी उत्तम नृत्यांगना आहे असं म्हंटलं तर खरंच हास्यास्पद होईल... पण हां..... नृत्यामुळे मला नक्कीच जगण्याची जाणीव होते. आमच्या बाईंना संगिताचार्य सौ वैशाली दुधे आणि तायांना बघूनच उत्तम नृत्यांगना म्हणा किंवा हृदयातून शिकणे काय असते हे कळते.  आणि तिथेच आपल्या आत्म्याचं परमात्म्याशी नातं तयार होतं. या सर्वांची परवणी बघणे म्हणजे गुरूपौर्णिमेचा दिवस.... गेली पाच वर्ष मी मंजिरी नृत्यकला मंदिर अर्थात आपल्या क्लासची गुरूपौर्णिमा जगत आहे. एकवेळ होती गुरूपौर्णिमेसाठी मी ही स्वामींच्या देवळाबाहेर लांबलचक रांगेत उभी असायची... एका छोट्याशा क्षणासाठी... माझ्या ...