पोस्ट्स

2018 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Mrs Vaishali Dudhe's 'नृत्यारंभ' book inauguration

इमेज

Mrs Vaishali Dudhe's नृत्यारंभ book inaugration

इमेज

पुन्हा एकदा शाळेत जावेसे वाटते....

इमेज
पुन्हा त्याच वर्गात... त्याच बेंचवर बसतांना संपूर्ण अंग शहारलं...   ठेवणीतल्या आठवणी कुठून तरी वाकुल्या दाखवत होत्या... आणि मी त्या बेंचवर बसून १ ली ते   १०वीच्या दिवसांमध्ये खरंच हरवून गेले ... आम्ही केलेली मस्ती... क्वचितच मारामारी... इतकंच नाही तर जुळ्या बहिणी असल्याने मी आणि माझ्या बहिणींनी दुस-यांना फसवण्यासाठी केलेल्या खोड्या.... दहा वर्ष ज्या शाळेत आपण लहानाचे मोठे झालो त्या शाळेत परत आल्यावर खुपच मस्त वाटत होतं... मुलीला सांगून निघाले होते आज मी ही शाळेत जाणार आहे आणि ती ही हे ऐकून मनापासून हसली... बाहेर निघतांना नेहमी मागे लागणारी माझी मुलगी आभाने आज मात्र हट्ट केला नाही... आणि परत लहान होण्याचा अनुभव घेता येणार म्हणून माझे डोळे चमकले.... तब्बल २० वर्षांनी माजी विद्यार्थ्यांच्या एकत्रीकरणामुळे परत   शाळेत येण्याचा योग आला... आणि असं वाटलं परत आपण लहान झालो आहोत... माझे मित्र आणि मैत्रिणी पुन्हा एकदा भेटले... आमच्या पटांगणात लावलेल्या भव्य दिव्य सेटने आपली शाळा अगदी झळाळून निघाली होती... विशेष म्हणजे   शाळेतला पहिला माजी विद्य...

हे चाललंय तरी काय???

इमेज
धर्म म्हणजे काय ? हे शिकवण्याची खरंच वेळ आली आहे का? धर्माच्या आणि जातीच्या नावाखाली राजकारण होतं... बंद होतात... जाळपोळही होते... पण बलात्कार???? आपल्या भावना इतक्या बोथट झाल्या आहेत का? एखाद्या समाजाला धडा शिकण्याची ही कोणती शिक्षा... ज्यात आसिफाचा बळी जावा... कोण आसिफा तर एक आठ वर्षाची चिमुरडी... या घटनेनं समाज व्यवस्था पुन्हा एकदा हतबल झाली आहे... बायकांच्या संरक्षणाच्या नावाखाली आतापर्यंत अनेक बलात्कार ऐकायला मिळालेत... त्यात फक्त समाजातील विकृतीच बघायला मिळाली... पण यावेळा धर्माच्या नावाखाली दिसलेली विकृती खरंच मन सुन्न करून जातेय.... हा धर्म नाही... आणि याला पाठिंबा देणा-यांना इतकंच म्हणावंसं वाटत ही लोकशाही नाही.... दुस-याच्या घराला लागलेली आग आपल्या घरापर्यंत केव्हा पोहचेल सांगता येत नाही... तिचे झालेले हाल पाहून प्रत्येक आई नक्कीच हळहळली असेल.... या घटनेने समाजातील महिलांचे नक्की स्थान काय आहे ते पुन्हा उघड झालेले आहे... २००६मध्ये निठारी हत्याकांड, २०१२मध्ये निर्भया बलात्कार केस, २०१६ कोपर्डी प्रकरण आणि आता हे... निर्भया प्रकरण सोडलं तर इतर प्रकरणांमध्ये बळी...