'गुरूआशिष' जादुई तिहाई....
शेवट गोड करी स्वामी , शेवट गोड करी ... ही स्वामींवर रचलेली भैरवी खुप आवडते पण त्याचा नृत्यातून प्रात्यक्षिकरित्या अर्थ समजावला तो आमच्या नृत्यगुरू नृत्यालंकार सौ. वैशाली दुधेंनी... गुरू शिष्याच्या नात जपणारी गुरूपौर्णिमा... यंदाच्या गुरूपौर्णिमेला आमच्य गुरूंनी तिहाईरुपी अमृत टाकून आमच्यातल्या कलाकाराला प्रेरीत केलं.... तिहाई म्हणजे तीन वेळा तत्कार करून समेवर समारोप करणे... अर्थात कोणत्याही नृत्याचा, गाण्याचा शेवट... पण हा शेवट खरे म्हणजे अंतिम सत्य आहे... सत्यम् शिवम् सुंदरम् किंवा ब्रम्हा विष्णु महेश... विज्ञानात म्हणावे तर प्रोटॉन न्युट्रोन इलेक्ट्रॉन.... बापरे... तिहाईबद्दल इतकी माहिती... आमच्या गुरू नृत्यालंकार सौ. वैशाली दुधे या सुंदरशा छोट्याशा पण खुप महत्वाच्या विषयावर PHD करत आहेत. त्यामुळे यंदाच्या गुरूपौर्णिमेच्या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य अर्थातच तिहाई हे होते.... बाईंचा छोट्याशा एक्सिडंटमुळे पायाला एअर फॅक्चर झाले... त्यामुळे या कार्यक्रमाला थोडा उशीर झाला खरा... पण या वैशिष्ट्यपू...