तो आला पण आयुर्वेदाने वाचवले.....
आज करोनाशी लढता-लढता दोन महिने पूर्ण व्हायला आले. वादळानंतर जशी भयाण शांतता पसरते आणि आपण परिस्थितीशी झुंजायला लागतो असं काहीसं आम्ही झुंजत होतो. कोलमडलेल्या मनातल्या घरांना आधार देत परत जोमाने उभे रहात होतो.... प्रत्येक आजारानंतर जी मनःस्थिती असते तिच होती... अशक्तपणा, थकवा येणं... पण कोणतंही भय नव्हतं. कारण या वादळाला न घाबरता आम्ही एका वावटळाप्रमाणे लढायचं ठरवलं होतं. खंरतर याचं संपूर्ण श्रेय आहे ते आयुर्वेदाला आणि आमचे डॉक्टर परीक्षित शेवडे यांना. आम्हाला स्वप्नात वाटले नव्हते ते झाले... कोरोना नावाचं वादळ आमच्या घरीही येऊन धडकलं. पण वेळीच या अघोरी पाहुण्याला हाकलवण्यात आम्ही यशस्वी ठरलो.... १ एप्रिलला अशोकला कणकण वाटली. व्हायरल असेल म्हणून आम्ही दुर्लक्ष करणार होतो... (कारण करोना होऊ नये यासाठी आम्ही काटेकोर पालन करत होतो. मास्क, अनावश्यक घराबाहेर न पडणे, वाफ, गुळण्या सर्व काही नियमित सुरू होते).... पण नको.... दिवस चांगले नाहीत म्हणत डॉ. परीक्षित शेवड्यांकडे गेलो आणि लगेच औषधे घ्यायला सुरूवात केली. तोपर्यंत मलाही कणकण यायला सुरू झाली. अशोकचा ताप उतरला पण तरीही काही कारणास्तो...