साडीलाही लागलेत ग्लोबलायझेशनचे वेध
नु कताच सर्वांनी गणेशोत्सव आनंदाने साजरा केला... आणि आता वेध लागले आहेत ते नवरात्रीचे... नऊ रंगाच्या नऊ साड्या नेसण्यासाठी सर्वच महिलांनी आपल्या ठेवणीतल्या साड्या काढण्यास सुरूवात केली असेल... सण म्हटले की साड्याच... पण खरंच साड्या बनतात कशा ? त्या मागचे कलाकार नक्की काम काय करतात... असे अनेक विचार कधी तरी आपल्याला भंडावून सोडत असतीलच... त्रिवेणीने हे समजून घेण्याची आम्हाला खुप मोठी संधी दिलेली आहे... त्रिवेणीच्या मार्फत आम्हाला साड्यांची निर्मितीची कहाणी कळली... आम्ही खास त्यांच्या साडी निर्मितीचे.... काका ही साडी नको ती दाखवा... याचा रंग जरासा गडद आहे... लाइट दाखवा ना.... असे म्हणत तासनतास आपण बायका साड्यांच्या दुकानांमध्ये आपली आवडती साडी शोधत असतो... हजारो प्रकार त्यातील काहीशे रंग... त्यातील आपण निवडलेल्या १० साड्या आणि त्यातून आपण एखादी पसंद करणार.... बापरे !!!!! किती ते श्रम... आणि हो इतकं करूनही आपल्या नवरोबांचे खडे बोल... नाही तर खवटपणे दिलेली एखादी कमेंट ऐकायची... पण खरंच एका नजरेत नाकारणा-या आपल्यासारख्या महिलांनी हे विसरता कामा नय...