साडीलाही लागलेत ग्लोबलायझेशनचे वेध
नुकताच सर्वांनी गणेशोत्सव आनंदाने साजरा केला... आणि आता वेध लागले आहेत ते नवरात्रीचे... नऊ रंगाच्या नऊ साड्या नेसण्यासाठी सर्वच महिलांनी आपल्या ठेवणीतल्या साड्या काढण्यास सुरूवात केली असेल... सण म्हटले की साड्याच... पण खरंच साड्या बनतात कशा? त्या मागचे कलाकार नक्की काम काय करतात... असे अनेक विचार कधी तरी आपल्याला भंडावून सोडत असतीलच... त्रिवेणीने हे समजून घेण्याची आम्हाला खुप मोठी संधी दिलेली आहे... त्रिवेणीच्या मार्फत आम्हाला साड्यांची निर्मितीची कहाणी कळली... आम्ही खास त्यांच्या साडी निर्मितीचे....
काका ही
साडी नको ती दाखवा... याचा रंग जरासा गडद आहे... लाइट दाखवा ना.... असे म्हणत
तासनतास आपण बायका साड्यांच्या दुकानांमध्ये आपली आवडती साडी शोधत असतो... हजारो
प्रकार त्यातील काहीशे रंग... त्यातील आपण निवडलेल्या १० साड्या आणि त्यातून आपण
एखादी पसंद करणार.... बापरे!!!!! किती ते
श्रम... आणि हो इतकं करूनही आपल्या नवरोबांचे खडे बोल... नाही तर खवटपणे दिलेली
एखादी कमेंट ऐकायची... पण खरंच एका नजरेत नाकारणा-या आपल्यासारख्या महिलांनी हे
विसरता कामा नये की, एका साडीमागे कित्येक जणांची मेहनत आणि वेळ उपयोगाला आलेला
असतो.
सुरतच्या
अनुपम टेक्सटाइल मार्केटमधील होलसेल आउटलेट त्रिवेणीकडून आमच्या एचओडी बिनू वाघेला
यांना आमंत्रण मिळाले. आणि माझ्या पदरात ही अनोखी भेट पडली... त्रिवेणी केवळ
होलसेल व्यापारी नाहीत तर त्यांचे आनलाइन पोर्टल https://www.triveniethnics.com आहे...
त्यांचे
आउटलेट, डिझाइन झोन आणि गोडाऊनमधील थक्क करणारे काम पाहून कळले की, एक साडी
बनवण्यामागे अनेक कामगार अहोरात्र मेहनत घेतात. कच्चा मालाच्या स्वरुपात हजारो
गठ्ठे रोज येऊन पडतात. एका गठ्ठ्यामध्ये दोन हजार साड्या... मग सुरू होतात
त्यांच्यावर संस्कार... सुरूवातीला साड्या मोजून कापल्या जातात. मग त्यावर लेस
लावून किंवा वेगवेगळ्या पद्धतीने काम केले जाते. पुन्हा साड्या तपासल्या जातात.
अगदी घडी घालण्यासाठीही प्रत्येक शिफ्टमध्ये ६ ते ८ कामगार काम करतात... मग त्या
मोजल्या जातात. आणि पँकिंग होते...
तर डिझाइनर साड्यांमध्ये तर साडीच्या कॅटलॉगमध्ये कित्येक दिवस फक्त डिझाइनवर विचार करण्यात जातात. विशेष म्हणजे यामध्येही बजेटवर लक्ष दिले जाते. सर्वांना परवडतील.... पण.... त्याची गुणवत्ता उत्तम असावी यासाठीही विचार केला जातो. इथल्या साड्यांमध्ये कधी मधुबनीची झाक दिसते... तर कधी बनारसीचा टच... कधी काठापदरामध्ये वेगवेगळ्या डिझाइन्स बघायला मिळतात... तर कधी दाक्षिणात्य पद्धत... अगदी साध्या साड्यांना सुद्धा आधुनिकतेची कड असते... प्रत्येक साडीच सौंदर्य अबाधित असतं... पण हा.... सामान्य गृहिणींना लक्षात ठेवूनच येथे साड्यांचे विविध डिझाइन्स तयार करतात. त्यावर ब्लाउजचे विविध कॉम्बिनेशन्सही ठरवतात. आणि मग या साड्यांना बाजाराचे वेध लागतात. अशाप्रकारे एक साडीचा कंपनी ते घर असा प्रवास पूर्ण होतो.
"त्रिवेणी
ब्रँड सर्व जनरेशनमध्ये फेमस व्हावा यासाठी आम्ही विशेष मेहनत घेतो. यासाठी आम्ही
वेगवेगळ्या ऑफर्स देतो आणि ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहचण्याचा
प्रयत्न करतो. सुरतच्या टेक्सटाइल बाजारपेठेला एक वेगळं नाव देण्याचे प्रयत्न त्रिवेणी
करत आहे", अशी माहिती अरविंद सराफ यांनी दिली.




"साडी आंतरराष्ट्रिय स्तरावर पारंपारिक पोशाख म्हणून कशी पुढे येईल याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे. आम्ही यासाठी प्रयत्न करत आहोतच. पण मेक इन इंडिया या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या ब्रँडमधून साडीला नवीन बळ मिळेल", असा विश्वास शैलेश सराफ यांनी व्यक्त केला. "यासाठी विशेष पातळीवर चर्चा झाली पाहिजे. जगातल्या काना कोप-यातील महिलांना साडी नेसण्यास प्रोत्साहन करावे यासाठी काही तरतूद करावी. यामुळे परदेशी महिला साड्या नेसतील आणि भारतीय बाजारपेठेला सुगीचे दिवस येतील", असेही ते म्हणाले.


साडीची
एथनिक वेअर म्हणून जगभर ओळख व्हावी यासाठी सराफ बंधू खुप मेहनत घेत आहेत.
अशाप्रकारचा विचार इतर साडी व्यापा-यांनी केला तर साडी जगभरात नक्कीच मानाचा बिंदू
ठरेल आणि ओघाने आपला भारत देशही...











Hey Bhagyshree...Every Girl or a lady looks gorgeous in Indian Attire especially saree...it is one of the oldest known items of clothing that is still in use.. u have described very nicely...I would like to thank you for selecting my pic's for your bloc & giving me the honors..
उत्तर द्याहटवाधन्यवाद.
हटवाआपल्या उद्योगास हार्दिक हार्दिक लाख लाख शुभेच्छा
उत्तर द्याहटवा