पोस्ट्स

2019 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आई तू गेलीस पण...

इमेज
सौ सरिता सुरेश कानडे जन्म २१ नोव्हेंबर १९५२ मृत्यू २७ मार्च २०१९ "आणखी एक वर्ष उंबरठा ओलांडत आहे. वर्षाखेर नेहमी एकच प्रश्न पडतो काय कमावलं आणि काय गमावलं... खरं तर आपण कधीच काही गमावत नाही... नेहमी कमावतोच...  पण यंदा ख-या अर्थानं मी बरंच काही गमावलं. यंदाचं वर्ष माझ्यासाठी तसं थरारकचं ठरलं... आईनं जगातून घेतलेली exit... काळीज थरारून निघालं.  २०१८मध्ये झालेल्या अपघातातून जरा कुठं मी स्वतःला सावरत होते... आणि भरारी घेण्यासाठी हात उंच करत होते... त्यात आईच्या या exitनं सर्वच समीकरण कोलमडली. आम्हाला अनपेक्षित प्रसंगाला सामोरं जावं लागत होतं." काहीजणांचा जन्म हा शापित असतो. त्यांच्या आयुष्यात नेहमी थरार असतो....  सतत मोठमोठाली वादळं त्यांच्या आयुष्यात घोंघावतात आणि त्यांना शांत करण्यामध्ये अनेक महिने निघून जातात. कधी कधी वर्ष देखील उलटतात...  आमचं ही काहीसं असंच आहे... यावेळा  आमच्या आयुष्यात आईच्या जाण्यानं नवीन वादळ निर्माण झालं...  ती गेली आणि आपल्या म्हणवणा-यांनी नवीन खेळ आरंभला... (काही वर्षापूर्वी यातून मुक्ती मिळावी म्हणून आम्ही (मी आणि माझी...

'K for Kathak'

इमेज
 .... हे आमच्या बाईंच्या नव्या पुस्तकाचं नाव आहे. या पुस्तकाचं प्रकाशन दिमाखदार सोहळ्यात २९ नोव्हेंबर २०१९ रोजी सावित्रबाई फुले इथं होणार आहे. मंजिरिअन्सच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. आपल्या शिक्षणाचा श्रीगणेशा झाला तो अ, आ, इ, ई.... नं. आता दिवस बदलले आहेत, आता शिक्षणाचा श्रीगणेशा होतो तोच A,B,C,D... नं (याला नक्कीच अपवाद आहेत). या परिवर्तनाबरोबर आपणही आपल्यात बदल केले पाहिजेत. ABCD वाल्यांना सुद्धा आपली संस्कृती आपले विचार आणि त्यातही शास्त्रीय  नृत्याबद्दलची माहिती पोहचणं खुपचं गरजेचं आहे. पाश्चात्य संस्कृतीपेक्षा आपला नृत्याभ्यास आणि नृत्याची परंपरा या पिढीला समजावी. हाच ध्यास आमच्या बाई डॉ. सौ वेशाली दुधे यांच्या कार्यातून दिसत आहे. शास्त्रीय नृत्याला आणि खास करून कथक नृत्याला पुढं आणण्यासाठी आमच्या बाई डॉ. सौ वेशाली दुधे नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यांची ही धडपड बघायला मिळते ती त्यांच्या लेखणीतून. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या बाईंनी आतापर्यंत तीन पुस्तक विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली आहेत. यातील पहिले 'dance Trail', त...

अशा विचारांचं काय करायचं....

आज हवामान खात्यातील डॉ. मेधा खोले यांची खूप आठवण झाली. दोन वर्षापूर्वी त्यांच्या सोवळ्याच्या बातमीनं  सोशल मीडियावर अक्षरशः खळबळ माजवली होती. त्यांची आठवण येण्याचं कारणही खूप STRONG आहे. गणपती आणि त्या दरम्यान घेण्यात येणा-या पाळी पुढे जाण्याच्या गोळ्या. आजच्या २३-२४ वर्षांच्या मुलींचे विचार ऐकले आणि आजही विचारांचे वारे भुरसटलेल्या विचारांमध्येच गुंतले आहे. आणि त्यावर संस्कृतीचा वर्ख चढवला जातो आहे. “ वेळ सकाळची.... ट्रेनमध्ये गणपतीसाठी गावी जाण्याची धामधूम सुरू होती. त्यातच लग्न न झालेल्या मुलींचा गहन विषय सुरू झाला गणपती दरम्यान येऊ घातलेली पाळी... आणि पाळी पुढे जावी म्हणून आपण कशा गोळ्या घेणार आहोत. इतर वेळा २३-३४ वर्षांच्या मुलींनां बायका म्हंटलं की तोंड वाकडी होतात. आम्ही अजून मुलीच आहोत हे निक्षून सांगायलाही कमी करत नाहीत.  पण आज त्यांचे विचार ऐकले आणि पायाखालची जमीन सरकली. ” गणपतीमध्ये आमच्या घरी कसा जल्लोष असतो. त्यात पाळी आली की कशाप्रकारे बाजूला बसवतात आणि मग आपल्याला किती वाईट वाटतं.... हे सर्व या मुलींनी बोलायला सुरूवात केली. आणि त्यावर उपाय ...