पोस्ट्स

सप्टेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अशा विचारांचं काय करायचं....

आज हवामान खात्यातील डॉ. मेधा खोले यांची खूप आठवण झाली. दोन वर्षापूर्वी त्यांच्या सोवळ्याच्या बातमीनं  सोशल मीडियावर अक्षरशः खळबळ माजवली होती. त्यांची आठवण येण्याचं कारणही खूप STRONG आहे. गणपती आणि त्या दरम्यान घेण्यात येणा-या पाळी पुढे जाण्याच्या गोळ्या. आजच्या २३-२४ वर्षांच्या मुलींचे विचार ऐकले आणि आजही विचारांचे वारे भुरसटलेल्या विचारांमध्येच गुंतले आहे. आणि त्यावर संस्कृतीचा वर्ख चढवला जातो आहे. “ वेळ सकाळची.... ट्रेनमध्ये गणपतीसाठी गावी जाण्याची धामधूम सुरू होती. त्यातच लग्न न झालेल्या मुलींचा गहन विषय सुरू झाला गणपती दरम्यान येऊ घातलेली पाळी... आणि पाळी पुढे जावी म्हणून आपण कशा गोळ्या घेणार आहोत. इतर वेळा २३-३४ वर्षांच्या मुलींनां बायका म्हंटलं की तोंड वाकडी होतात. आम्ही अजून मुलीच आहोत हे निक्षून सांगायलाही कमी करत नाहीत.  पण आज त्यांचे विचार ऐकले आणि पायाखालची जमीन सरकली. ” गणपतीमध्ये आमच्या घरी कसा जल्लोष असतो. त्यात पाळी आली की कशाप्रकारे बाजूला बसवतात आणि मग आपल्याला किती वाईट वाटतं.... हे सर्व या मुलींनी बोलायला सुरूवात केली. आणि त्यावर उपाय ...