आई तू गेलीस पण...
सौ सरिता सुरेश कानडे जन्म २१ नोव्हेंबर १९५२ मृत्यू २७ मार्च २०१९ "आणखी एक वर्ष उंबरठा ओलांडत आहे. वर्षाखेर नेहमी एकच प्रश्न पडतो काय कमावलं आणि काय गमावलं... खरं तर आपण कधीच काही गमावत नाही... नेहमी कमावतोच... पण यंदा ख-या अर्थानं मी बरंच काही गमावलं. यंदाचं वर्ष माझ्यासाठी तसं थरारकचं ठरलं... आईनं जगातून घेतलेली exit... काळीज थरारून निघालं. २०१८मध्ये झालेल्या अपघातातून जरा कुठं मी स्वतःला सावरत होते... आणि भरारी घेण्यासाठी हात उंच करत होते... त्यात आईच्या या exitनं सर्वच समीकरण कोलमडली. आम्हाला अनपेक्षित प्रसंगाला सामोरं जावं लागत होतं." काहीजणांचा जन्म हा शापित असतो. त्यांच्या आयुष्यात नेहमी थरार असतो.... सतत मोठमोठाली वादळं त्यांच्या आयुष्यात घोंघावतात आणि त्यांना शांत करण्यामध्ये अनेक महिने निघून जातात. कधी कधी वर्ष देखील उलटतात... आमचं ही काहीसं असंच आहे... यावेळा आमच्या आयुष्यात आईच्या जाण्यानं नवीन वादळ निर्माण झालं... ती गेली आणि आपल्या म्हणवणा-यांनी नवीन खेळ आरंभला... (काही वर्षापूर्वी यातून मुक्ती मिळावी म्हणून आम्ही (मी आणि माझी...