पोस्ट्स

मे, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दुष्काळ विरोधातील गावक-यांच्या मोहीमेला डोंबिवलीच्या स वा जोशी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांची साथ

इमेज
एकीकडे महाराष्ट्रातील आंबेजोगाई तालुक्यामधील दुष्काळ आणि दुसरीकडे तिथल्याच काही गावांनी जलसंवर्धनासाठी उचलेला वसा... दुष्काळावर मात करण्यासाठी या गावक-यांनी पुढाकार घेतला आणि गावामध्ये विविध सरकारी योजना आणि खाजगी संस्थांच्या मदतीने पाणी अडवण्यासाठी जलसंवर्धनाच्या कामासाठी श्रमदान करण्यास सुरूवात केली आहे. हे गावकरी सर्व भांडणतंटे, जात, धर्म, पक्ष बाजूला ठेवून एकजुटीने राबतांना दिसत आहेत. त्यांना विश्वास आहे यंदा तिथल्या जमिनीतील पाण्याचा स्तर वाढेल आणि त्यांना पाण्यासाठी दाही दिशा फिरावे लागणार नाही. यासाठी विशेष मेहनत घेत आहेत ते ज्ञानप्रबोधिनीचे प्रसाद चिक्षे. चिक्षेंचे गावामधील काम बघून स वा जोशीचे काही माजी विद्यार्थी एकत्र आले आणि सामाजिक जाणीवेतून त्यांनी त्यांच्या कार्याला हातभार लावण्याचा विचार केला. त्यांनी काही पैसे जमा केले आणि दोन गावांच्या प्रकल्पांना मदत करण्याचे ठरवले. चिक्षेंच्या मार्गदर्शनामुळे आधीच गावकरी झटून कामाला लागले आहेतच. गेल्या आठवड्यात आम्ही तिथल्या गावांना भेटी दिली. यात कुंबेफळ, श्रीपतराय वाडी, धनोर, राडीतांडा या गावातील जलसंवर्धन कामाची पाहणी केल...