कोविड आणि Work From Home (WFH)
कोरोनानं घातलेल्या थैमानामुळे अनेकजण आज Work From Home करतांना दिसत आहे. काही जण खूप आनंदात आहेत. पण काहींना या राक्षसानं जेरीस आणलेलं आहे. असं काय घडतय की Work From Home खरंच अनेकजणांना त्रासदायक वाटतय. पण खरंच हे इतकं त्रासदायक आहे का? आजची परिस्थिती: Work From Home :- बाहेर कोरोनाने अक्षरशः थैमान घातलं आहे. गेले दोन महिने सर्वजण Lock Down चा अनुभव घेत आहेत. काही कंपन्यांना आपल्या एम्प्लॉइजना घरी काम करण्यास सांगितले आहे. म्हणजे ऑफिसची जी काम घरी बसून करता येतात ती आपण करू शकतो. यासाठी लॅपटॉप किंवा डेस्कटॉप आणि इंटरनेटची गरज आहे. खरे तर ही संस्कृती तशी Multi National Companies त्यातल्या त्यात आयटी कंपन्यांनी आणलेली असं म्हणायला हरकत नाही. घरी बसून आपले आठ तास पूर्ण करा पण काम कराच अशी ही संकल्पना. पण याचा गैरफायदा इथेही घेण्यात येत आहे. कंपन्यांसाठी बरेचजण सध्या शनिवार रविवारसह १२-१२ आणि कधीकधी तर १८ तास काम करत आहेत. त्यामुळे खरंच व्रक फ्रॉम होम योग्य की अयोग्य हा प्रश्न वाढत चालला आहे. डोळे ताणून डोक्याला झिणझिण्या येईस्तोवर घरातून काम करा. मग एकच ....अरे ऑफिसच परवडल...