कोविड आणि Work From Home (WFH)
कोरोनानं घातलेल्या थैमानामुळे अनेकजण आज Work From Home करतांना दिसत आहे. काही जण खूप आनंदात आहेत. पण काहींना या राक्षसानं जेरीस आणलेलं आहे. असं काय घडतय की Work From Home खरंच अनेकजणांना त्रासदायक वाटतय. पण खरंच हे इतकं त्रासदायक आहे का?
आजची परिस्थिती: Work From Home :-
बाहेर कोरोनाने अक्षरशः थैमान घातलं आहे. गेले दोन महिने सर्वजण Lock Down चा अनुभव घेत आहेत. काही कंपन्यांना आपल्या एम्प्लॉइजना घरी काम करण्यास सांगितले आहे. म्हणजे ऑफिसची जी काम घरी बसून करता येतात ती आपण करू शकतो. यासाठी लॅपटॉप किंवा डेस्कटॉप आणि इंटरनेटची गरज आहे. खरे तर ही संस्कृती तशी Multi National Companies त्यातल्या त्यात आयटी कंपन्यांनी आणलेली असं म्हणायला हरकत नाही. घरी बसून आपले आठ तास पूर्ण करा पण काम कराच अशी ही संकल्पना. पण याचा गैरफायदा इथेही घेण्यात येत आहे. कंपन्यांसाठी बरेचजण सध्या शनिवार रविवारसह १२-१२ आणि कधीकधी तर १८ तास काम करत आहेत. त्यामुळे खरंच व्रक फ्रॉम होम योग्य की अयोग्य हा प्रश्न वाढत चालला आहे. डोळे ताणून डोक्याला झिणझिण्या येईस्तोवर घरातून काम करा. मग एकच ....अरे ऑफिसच परवडलं. प्रत्येकाला आपली रोजची ट्रेन आठवत आहे. काहीजणांना तर आपला ट्रेनची ग्रुप, आपलं ऑफिस तिथली मंडळी असं सर्वजण खुणवत आहेत. काहींना हॉटेल्स, ढाबे आणि बिअर बारही आठवत आहेत.
ही झाली Work From Home ची काळी किनार. त्यामुळे बरेचजणांचा बांध सुटत चालला आहे.
आता यातून मिळत असलेले फायदे आपण समजून घेऊयात. आपल्याला फक्त सवय झाली आहे कोणत्याही गोष्टीत खुसपट काढायची. बघितलं तर हा सौदा घाट्याचा नाही.
१. आज आपल्या घरातल्या सदस्यांन बरोबर थोडा वेळ न कंटाळता घालवायला मिळतो
२. आपल्या जवळील व्यक्तिंबरोबर आपण मनमुराद गप्पा मारू शकतो.
३. सध्या अनेकजण नविन पदार्थ बनवत आहेत. याला नाव ठेवणारेही आहेत. पण कामाच्या धकाधकीतून आपण स्वयंपाक घरात जाणे टाळायचो. अर्थात एकच दिवस सुट्टीचा असायचा. पण आता आपण नवनवीन पदार्थ घरीच बनवून हॉटेलचा खर्च वाचवत आहोत.
४. अनेकांना आपल्या माणसांचे खरे स्वभाव सुद्धा माहित नसतील. त्यांना नव्याने ओळखण्याचा फायदा होत आहे.
५. आपल्याला ऑफिस गाठायला लागणारा वेळ आपण योग्य ठिकाणी लावत आहोत.
६. अनेकजण अनेक प्रकारचे ऑनलाईन शॉर्ट कोर्सेस करत आहेत.
७. ज्यांच्याकडे लहान मुलं आहेत त्यांना आपण मोठे होतांना बघत आहोत.
८. अचानक आपल्याला आवडते छंद जोपासायला मिळत आहेत.
९. योग अभ्यास आपण करू शकतो.
वर्क फ्रॉम होमबरोबर आपण अशाप्रकारे अनेक गोष्टी करत आहोत पण आपल्याला हे फायदेशीर बारकावे जाणवतच नाही. खरंच ही वेळ परत येणार नाही. एकत्र कुटुंबाबरोबर असा वेळ यापुढे खरंच शक्य नाही. आपलं माणूस डोळ्यासमोर असणे ही एक गरजच आहे की... त्यामुळे घरीच रहा सुरक्षित रहा.
#STAYHOMESTAYSAFE


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा