कोविड आणि मीडिया
काही दिवसापूर्वी एका महिला पत्रकाराला बातमी संदर्भात कॉल केला... बोलणं झाल्यानंतर सहज विचारलं काय गं कशी आहेस? काळजी घे समोरनं उत्तर आलं छान आणि हो थँक्स असं विचारल्याबद्दल... खरंच मनातल्या लहरींनी वेग धरला... म्हणाले असं का बोलतेस ... अगं तुला एक मुलगा आहे तो लहान आहे आणि तरी तू रिपोर्टींग करतेस... तरी जरा संभाळून... तिने हो असे उत्तर दिल...
काळजी घे.... हे शब्द सध्या खूप महत्वाचे आहेत...
कोरोनामध्ये आज प्रत्येक रिपोर्टर, कॅमेरामनच नाही तर डेस्कवर असणारे, एडिटर, प्रोड्युसर, एंकरपासून सर्वजण जीव मुठीत ठेवून काम करत आहेत. बोलणारे महाभाग बोलतातही आम्ही थोडी करायला सांगितलं आहे का... पण आज ज्या बातम्या आपण बघतो किंवा एक एक issue बघतो ते फक्त आणि फक्त या मीडियामुळे साध्य होते.
माझी बहिण आजही ऑफिसला जाते. त्यांच्याकडे आजही वातावरण ब-यापैकी तंग असतं. अनेकजणांना अगदी तिच्या बाजूच्याला कोरोना झाला होता. घरी लहान मुलगा आणि म्हातारे सासरे... पण ती ऑफिसला आजही जाते. बोलणारे बोलणार तिला काय शहाणपणा करायची गरज आहे. पण हा तिचा job profile आहे. तिचे किस्से खरंच काळजाला धडकी भरणारे... कोविड होईल की काय ही भितीसुद्धा किती भयंकर असते ते आम्ही अनुभवत आहे...
एका पुरूष पत्रकाराला फोन केला... तो नुकताच कोविडमधून बरा होऊन रिपोर्टिंगला सुरूवात केली होती... त्याला विचारलं काय रे कसा अनुभव कोरोनाचा.... त्याने सांगितलं खूप भयंकर... अग शरिराची वाट लागते गं... मग पुढचा प्रश्न आता रिपोर्टिंग चालू आहे का... तर उत्तर आलं हो... प्रतिप्रश्न करत विचारलं तू सध्या पत्रकारितेत नाहीस पण असतीस तर तू ही तेच केलं असतं...
खरंच की....
मी १० वर्ष मागे गेले... ती ११ वर्षे इंद्रधनुष्यासारखी माझ्यासमोर आली... खरंच ते मंतरलेले दिवस... काय नाही केलं... पूर, बॉम्बस्फोट, आतंकवादी हल्ला, वेगवेगळ्या कोर्ट केसेस, मनसेचा जन्म, स्वभिमान पक्षाचा जन्म, आंदोलन.... रोज सकाळची सुरूवात नव्याने व्हायची... आज काय असणार हे अनुभवायला निघायची... ११ वर्ष फक्त माझं Journalism मनापासून अनुभवलं त्यावर प्रेम केलं... आजंही मरा माझं पहिलं प्रेम कोणतं हा प्रश्न विचारला तर उत्तर एकचं माझी पत्रकारिता, माझं फिल्ड वर्कचं आहे... ते अनुभवणं स्वर्गाहून सुख मिळाल्यासारखं आहे.
पत्रकार इतकं सगळं अनुभवत असतांना एखादा त्यांच्या विरोधातील मॅसेज आले की हे पत्रकार खूप disturb होतात. त्यांना चिडवणारे मिम्स, नाव ठेवणारे मॅसेजने त्यांनाही राग येतो... पत्रकारिता हा जीवघेणा प्रवास आहे. channel चे धोरण सांभाळावं लागतं. तसंच management, सरकारची धोरणं बदलत राहतात. ती follow करावी लागतात. आणि हो आपल्या सारखी जनता जनार्दन असतातच. त्यातील ९० टक्के लोकांना रंगवलेल्याच बातम्या आवडतात.
आजही पाऊस सुरू झाला की आपण पहिले ट्रेनचे हालहवाल बघायला न्युज चॅनेल लावतो... तरीही आपण पत्रकारांनाच नावं ठेवतो... खरंच हे कितपत योग्य आहे... टीआरपी हा एका सेन्सेक्स सारखा आहे... त्यावर त्यांचं पोटही असतं. आपण पगार वाढावा म्हणून खटाटोप करतोच की... ज्यांच्या बातम्या चुकीच्या असतात त्यांच्यावर कारवाई झालेली आहे... घरी बसून बोलणं सोप असतं पण आजही न्याय मिळावा म्हणून पत्रकारांकडेच सर्वजण धाव घेतात. मग त्यांना का नावं ठेवायची.
आणि एकतर्फी बातमी लावायची नाही हे ethics सांगतात. finally आता हे पण बोललं जाईल की कशाला असं प्रोफेशन जगायचं. तर जगून बघा. या इतक्या गर्दीमध्ये अजूनही काही पत्रकार खूप चांगले उपक्रम करत आहेत. आणि हो ते दिसतातही पण कोणाला positive बघायचंच नसतं. सगळ्यांना negative बघायचं असतं.
पत्रकारांमुळे सरकारला अनेक धोरणं बदलावी लागली आहेत.
कसाबला आणि निर्भयाच्या आरोपींना फाशी द्यावी लागली. मागच्या वर्षीचा पूर खरंच मीडियाने काय मदत केली. जिथे सरकार काय कोणी जावू शकलं नाही तेव्हा हीच मीडिया पोचली. आपण फक्त टिव्ही बघतं होतं. आणि बापरे!!!! बसं इतकंच बोललो. आणि काही दिवसापूर्वी आलेले चक्रीवादळ.... सरकार पोचलं.... नाही ना... पण मीडियाने सत्य परिस्थिती दाखवली.... तेव्हा कोणी कौतुक केलं नाही? मग.... आपण आणि आपली मुलं काही अंशी ह्यांच्यामुळेसुद्धा सुखी आहोत.
हे सर्व लिहायचा खटाटोप माझ्या बहिणीसाठी आणि माझ्या रिपोर्टर्स मित्रमैत्रिणींसाठी करत आहे. त्यांचं रोजचं मरण मी बघते आहे. त्यामुळे मीडिया विरोधात लिहिणं सध्या तरी योग्य नाही. म्हणून जरा please आपण मीडियाबद्दल चांगलं बोलू शकत नसलो तरी वाईट तरी बोलू नये. सध्या तरी.... नंतर आहेच... उघडा डोळे.... किंवा एक पाऊल मागे.... करायच्या टिंगल टवाळक्या....
राग आला असेल तर सॉरी पण यावर एक उपायही सांगते. तुम्ही फोन लावा खाली एक लाईन येते. काही प्रक्षोभक वाटलं चुकीचं वाटलं तर broad casting ला कळवा. लावा त्यांना फोन सांगा हे चुकीचं चाललंय.
पढेगा इंडिया तो बढेगा इंडिया
@Bhagyashree K ✒️🖋️

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा