हे चाललंय तरी काय???

Related image




धर्म म्हणजे काय ? हे शिकवण्याची खरंच वेळ आली आहे का? धर्माच्या आणि जातीच्या नावाखाली राजकारण होतं... बंद होतात... जाळपोळही होते... पण बलात्कार???? आपल्या भावना इतक्या बोथट झाल्या आहेत का? एखाद्या समाजाला धडा शिकण्याची ही कोणती शिक्षा... ज्यात आसिफाचा बळी जावा... कोण आसिफा तर एक आठ वर्षाची चिमुरडी...

या घटनेनं समाज व्यवस्था पुन्हा एकदा हतबल झाली आहे... बायकांच्या संरक्षणाच्या नावाखाली आतापर्यंत अनेक बलात्कार ऐकायला मिळालेत... त्यात फक्त समाजातील विकृतीच बघायला मिळाली... पण यावेळा धर्माच्या नावाखाली दिसलेली विकृती खरंच मन सुन्न करून जातेय.... हा धर्म नाही... आणि याला पाठिंबा देणा-यांना इतकंच म्हणावंसं वाटत ही लोकशाही नाही.... दुस-याच्या घराला लागलेली आग आपल्या घरापर्यंत केव्हा पोहचेल सांगता येत नाही...

तिचे झालेले हाल पाहून प्रत्येक आई नक्कीच हळहळली असेल.... या घटनेने समाजातील महिलांचे नक्की स्थान काय आहे ते पुन्हा उघड झालेले आहे... २००६मध्ये निठारी हत्याकांड, २०१२मध्ये निर्भया बलात्कार केस, २०१६ कोपर्डी प्रकरण आणि आता हे... निर्भया प्रकरण सोडलं तर इतर प्रकरणांमध्ये बळी चिमुकल्या मुलींचाच गेलाय...

फार पूर्वीपासून बायकांनाच लक्ष्य केलं आहे... आजही तिचं वस्तुस्थिती आहे.... असं नाहीतर त्यापेक्षा बिकट झालेली आहे... आपण २१ व्या शतकाचे गीत गातो... महिला सक्षमीकरणाचे कित्ते गिरवतो... पण मानसिकता तिचं... बायकांना आरक्षण देण्यापेक्षा त्यांना मनात स्थान द्या.... म्हणजे आपणहूनच समाजातील तिची प्रतिमा उंचावेल... आणि हे प्रत्येकाने मनाने केले पाहिजे आणि पुढच्या पिढीला समजावले पाहिजे.... नाहीतर कितीही फाशीची शिक्षा दिली तरी काही फायदा नाही.... कारण मनातील विकृती वाढतं चाललीय आहे....

बेटी बचाओ नुसतं म्हणून चालणार नाही तर तिला सन्मान द्यायला शिकवणे ही खरी गरज आहे... धर्म, जाती यांच्यापेक्षा माणुसकीचा धर्म आज आपण पाळला पाहिजे... आणि स्त्रीला माणूस म्हणूनच वागणूक दिली पाहिजे...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोविड आणि Work From Home (WFH)

कोविड आणि मीडिया