तो आला पण आयुर्वेदाने वाचवले.....

 



आज करोनाशी लढता-लढता दोन महिने पूर्ण व्हायला आले. वादळानंतर जशी भयाण शांतता पसरते आणि आपण परिस्थितीशी झुंजायला लागतो असं काहीसं आम्ही झुंजत होतो. कोलमडलेल्या मनातल्या घरांना आधार देत परत जोमाने उभे रहात होतो.... प्रत्येक आजारानंतर जी मनःस्थिती असते तिच होती... अशक्तपणा, थकवा येणं... पण कोणतंही भय नव्हतं. कारण या वादळाला न घाबरता आम्ही एका वावटळाप्रमाणे लढायचं ठरवलं होतं. खंरतर याचं संपूर्ण श्रेय आहे ते आयुर्वेदाला आणि आमचे डॉक्टर परीक्षित शेवडे यांना.

आम्हाला स्वप्नात वाटले नव्हते ते झाले... कोरोना नावाचं वादळ आमच्या घरीही येऊन धडकलं. पण वेळीच या अघोरी पाहुण्याला हाकलवण्यात आम्ही यशस्वी ठरलो.... १ एप्रिलला अशोकला कणकण वाटली. व्हायरल असेल म्हणून आम्ही दुर्लक्ष करणार होतो... (कारण करोना होऊ नये यासाठी आम्ही काटेकोर पालन करत होतो. मास्क, अनावश्यक घराबाहेर न पडणे, वाफ, गुळण्या सर्व काही नियमित सुरू होते).... पण नको.... दिवस चांगले नाहीत म्हणत डॉ. परीक्षित शेवड्यांकडे गेलो आणि लगेच औषधे घ्यायला सुरूवात केली. तोपर्यंत मलाही कणकण यायला सुरू झाली. अशोकचा ताप उतरला पण तरीही काही कारणास्तोवर ४ दिवसांनी कोरोना टेस्ट केली आणि समजले कोरोनाने एप्रिलफूल म्हणत घरी आगमन केलेच आहे... त्यानंतर दोन दिवसात मला वास येणं बंद झालं... आम्ही सहा दिवसांपूर्वीच लक्षणे दिसताच डॉक्टरांकडे गेलो.... व्यवस्थित औषधं, चाटण सुरू केली होती... त्यामुळं आम्हाल तसं कमी टेंशन होतं. सात दिवसांनी HRCT Report काढला... आमचा काऊंट (माझा २ आणि अशोकचा ४) कमी होता...

खरंतर रुग्ण positive आल्यानंतर जशी सरळसोट औषधं वाटली जातात तशी आम्हालाही मिळाली. आम्हाला ताप नसतांनाही Fabi flue सारखे high dose घेण्यास सांगण्यात आले होते. याबद्दल आम्ही अनेकांचे अनुभव ऐकले. त्यातून आम्हाला कळलं आम्हाला ताप नसल्याने या औषधांची गरज नव्हती. प्रत्येकाच्या symptoms नुसार औषधं द्यायला हवी. कारण याचे side effects ही भयंकर असतात. आम्ही आधीच आयुर्वेदिक औषध घ्यायचं ठरवलं होतं. (हे एवढ्यासाठी लिहिलं आहे. एक तर माझ्यातला पत्रकार चौकस असतोच आणि दुसरं म्हणजे परत आयुर्वेदाचे अंधभक्त असं सहज म्हणायला सुरू व्हायचं आणि खरं परत लपायचं. सर्वांना proof लागतात ना) होम क्वारंटाइन होणार म्हणून संबंधित अधिका-यांना कळवलं.

मी एक अस्थमा पेशंट आहे... त्यामुळे मला कोरोना झाल्यावर सगळ्यांचे धाबे दणाणले होते. आयुर्वेदाच्या औषधांनी कोरोना बरा होत आहे. हे माहित होते. पण त्याचा आता अनुभवही घेतला. उगाच high power च्या गोळ्या घेऊन शरीराचा खुळखुळा करून घेण्यापेक्षा मी नेहमीच आयुर्वेदाला महत्व दिलं आहे. याही वेळा तेच झालं. बरेच जणांनी मला आयुर्वेद करून कोणताही chance घेऊ नकोस.... आयुर्वेदाचा result उशिरा येतो (ही एक अंधश्रद्धा आहे).... रेमडिसिव्हरचा डोस घे... हॉस्पिटलमध्येच जा... असे बरेच सल्ले दिले... पण एकदा आपल्या डॉक्टरांवर डोळे झाकून विश्वास ठेवण्यावर ठाम असल्याने मी फक्त हो म्हणाले....

सतरा दिवसाच्या या क्वारंटाईन कालावधीमध्ये आम्ही खरंच दिवस मोजत होतो... इतके दिवस WFH मुळे मी २०-२० दिवस बाहेर पडत नव्हते पण हे तेरा दिवस वर्षासारखे गेले... या दिवसांमध्ये आमच्या घरच्यांना वाफ आणि गरमपाणी, हळदपाण्याच्या गुळण्या करणे (जे आधीपासून सुरूच होतं) रोज न चुकता केलं. आता कोरोनाचा धोका उतरला आहे. आम्ही सर्वजण सुखरूप आहोत. वेळीच आम्ही डॉक्टरांचं मार्गदर्शन आणि औषधे घेतलीली नसती तर काही खरं नव्हतं.

करोनानंतर अस्थमाने डोके वर काढले, चालता येत नव्हते, थंडी वाजायची अशा अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागले. पण परत आमचे डॉक्टर होतेच. हे सगळं होणार होतं हे बहुतेक त्यांना माहित होतं. त्यांची जुनी रुग्ण असल्याने करोनानंतरचे धोके लक्षात घेता त्यांनी आधीच औषधे सुरू केली होती...

आज २ महिन्यानंतर मी नक्की सांगू शकते करोनाला न घाबरता लढणं हे ही एक औषधचं आहे. करोनाच्या पहिल्या लाटेमध्ये डॉक्टरांनी हे आमच्या मनावर व्यवस्थित बिबंवलं होतं. त्यांनी सांगितलेली काही वाक्य....
1.       करोनाबद्दलची भिती काढून टाका आणि तुम्हाला करोना होणार नाही असंच वागा (मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंग, वाफ घेणे).
2.       कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करायचं नाही.
3.       करोनावर आयुर्वेदामध्ये खुप पावरफूल औषधं आहेत.
4.       प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी आहे.
5.       सर्व घेतात म्हणून तुम्ही व्हिटामिन सी उगाच घेऊ नका.
6.       बरं वाटत नसेल तर फळं सोडा आणि हलका आहार सुरू करा.
7.       कोणताही काढा घेतांना अथवा आयुर्वेदिक औषध घेतांना वैद्यांचा सल्ला घ्या.

हे सांगण्याचं कारणही तसंच आहे. बरेच जणांनी सांगितलं आपल्याला मानसिक त्रास होतो. कारण खरंतर आपण भितीपोटी अर्धे होतो. आपण नवीन प्रयोग करत बसतो. उगाच व्हिटॅमिनच्या गोळ्या सुरू करतो...  मनात येतील तशी औषध घेतो. आणि शेवटी प्रकरण अंगाशी येतं... काहीजण तर आपल्याला करोना कसा होणार नाही हे समजवतात. पण करोना कोणालाही होऊ शकतो. त्याच्याशी काटोकोरपणे डॉक्टरांच्या सल्ल्यांनी औषधं घेतली, संयमानं झुंज दिली तर आपण सुखरूप सुटू शकतो. तसंच कोणताही आजार अंगावर न काढता लगेच डॉक्टरांकडे गेल्याने आपल्या परिवारावरील संकटही कमी करू शकतो. हेच आम्हीतरी अनुभवातून शिकलो. आपल्याकडे अजूनही आयुर्वेदिक औषधं म्हंटल्यावर तोंडावर बोट ठेवलं जातं. पण खरंच आयुर्वेद आपली कमाल दाखवणं थांबवू शकत नाही. खरंच माझ्यासाठी तर यावेळाही परत आयुर्वेद जिंकले.
    

@भाग्यश्री खेडकर 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोविड आणि Work From Home (WFH)

कोविड आणि मीडिया