'गुरूआशिष' जादुई तिहाई....

शेवट गोड करी स्वामी, शेवट गोड करी...
ही स्वामींवर रचलेली भैरवी खुप आवडते पण त्याचा नृत्यातून प्रात्यक्षिकरित्या अर्थ समजावला तो आमच्या नृत्यगुरू नृत्यालंकार सौ. वैशाली दुधेंनी... गुरू शिष्याच्या नात जपणारी गुरूपौर्णिमा... यंदाच्या गुरूपौर्णिमेला आमच्य गुरूंनी तिहाईरुपी अमृत टाकून आमच्यातल्या कलाकाराला प्रेरीत केलं....
तिहाई म्हणजे तीन वेळा तत्कार करून समेवर समारोप करणे... अर्थात कोणत्याही नृत्याचा, गाण्याचा शेवट... पण हा शेवट खरे म्हणजे अंतिम सत्य आहे... सत्यम् शिवम् सुंदरम् किंवा ब्रम्हा विष्णु महेश... विज्ञानात म्हणावे तर प्रोटॉन न्युट्रोन इलेक्ट्रॉन.... बापरे... तिहाईबद्दल इतकी माहिती... आमच्या गुरू नृत्यालंकार सौ. वैशाली दुधे या सुंदरशा छोट्याशा पण खुप महत्वाच्या विषयावर PHD करत आहेत. त्यामुळे यंदाच्या गुरूपौर्णिमेच्या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य अर्थातच तिहाई हे होते....

 
बाईंचा छोट्याशा एक्सिडंटमुळे पायाला एअर फॅक्चर झाले... त्यामुळे या कार्यक्रमाला थोडा उशीर झाला खरा... पण या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमामुळे आमच्यासारख्या नवशिक्यांसाठी ज्ञानाची कवाडे खुली झाली... आमच्यासारख्या सर्व साधारण व्यक्तींना हि-यासारखे बनवण्यासाठी आमचा मंजिरी नृत्यकला मंदिर अथक झटत असते.

यंदाही अगदी प्रथमापासून ते नृत्यालंकारपर्यंतच्या सर्व मुलींनी खुप सुंदर तिहाई सादर केल्या... सौ. दुधे यांनी गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरूवात केली
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तबलावादक प्रविण करकरे यांनी तिहाईचे महत्व आणखी विषद केले... विशेष म्हणजे त्यांनी तिहाई कधीच चुकू नये कारण तिहाई हा महत्वाचा अंग आहे... कठिण तिहाई येत नसेल तर सोपी करा पण ती व्यवस्थित न चुकता करा असे सल्लावजा निवेदन त्यांनी यावेळी केले.
 
या कार्यक्रमाचा एक भाग मी ही आहे हीच माझ्यासाठी खुप मोठी गोष्ट आहे.
धन्यवाद
नृत्यगुरू नृत्यालंकार सौ. वैशाली दुधे, नृत्यालंकार सुगंधा कोल्हटकर


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोविड आणि Work From Home (WFH)

कोविड आणि मीडिया